तिसरे महायुद्ध पेटलेच तर या असतील सर्वात सुरक्षित जागा

सध्याच्या जागतिक परिस्थिती मध्ये तिसरे जागतिक महायुद्ध कधीही सुरु होऊ शकेल असे म्हटले जात आहे. रशिया युक्रेन लढाई, उत्तर कोरियाच्या मिसाईल चाचण्या, चीन तैवान मधील तेढ या व अश्या अनेक कारणांनी अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडालाच तर जगाच्या पाठीवर कुठल्या जागा सर्वात सुरक्षित ठरतील याची चर्चा होऊ लागली आहे.

२०२१ च्या ग्लोबल पीस इंडेक्सच्या अध्ययनानुसार भूगोलिक मानदंड याबाबत महत्वाचे ठरणार आहेत. त्यानुसार आईसलंड हा युरोपीय देश फेव्हरीट डेस्टीनेशन आहे. त्याची भौगोलिक स्थिती खास आहे कारण हा देश युरोपच्या उत्तरेला दूर अटलांटिक महासागरात आहे. हा देश नाटोचा सदस्य आहे पण त्यांचे स्वतःचे सैन्य नाही. या यादीत दोन नंबरवर आहे न्यूझीलंड. हा शांत देश तसाही जगापासून लांब असल्याने येथे युद्धाची झळ फारशी लागणार नाही. रशिया, अमेरिकेपासून तो दूर आहे हे अधिक महत्वाचे मानले जात आहे.

डेन्मार्क हा सुद्धा शांत आणि सुरक्षित देश असून ग्रीनलंडवर कब्जा असल्याने तो आणखी सुरक्षित आहे. हा नाटो सदस्य आहे पण ग्रीनलंड स्वतंत्र आहे. आयर्लंड इंग्लंडच्या जवळचा देश नाटोचा सदस्य नाही. युद्ध पेटलेच तर इंग्लंड मुळे या देशाला थोडी झळ बसू शकते पण तशी शक्यता कमी आहे. कॅनडाची भौगोलिक परिस्थिती खास आहे. अमेरिकेला जवळ असलेल्या या देशात युरोपीय नागरिक अधिक आहेत. हा देश विशाल आहेच पण शांती पूर्ण मानला जातो.

ऑस्ट्रेलियाची भौगोलिक स्थिती पाहता या देशाला युद्धाची झळ लागण्याची शक्यता कमी आहे. हा देश कोणत्याच सैन्य गटाचा सदस्य नाही पण आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रीय आहे. ऑस्ट्रेलिया नाटो सदस्य नाही पण नाटो सहयोगी आहे.