टाटांची नॅनो इलेक्ट्रिक अवतारात येणार

देशात २०२० मध्ये बीएस ६ नॉर्म लागू झाल्यामुळे टाटा मोटर्सने सफारी स्टॉर्म आणि नॅनो कार्स चे उत्पादन बंद केले. जगातील सर्वात स्वस्त कार, रतन टाटा यांच्या स्वप्नातील कार, सर्वसामान्य माणसाचे कारचे स्वप्न पूर्ण करणारी कार अश्या अनेक कारणांनी प्रसिद्ध झालेली नॅनो व्यावसायिक दृष्टया म्हणावी तितकी यशस्वी ठरली नाही. त्या काळात केवळ १ लाखात उपलब्ध करून दिली गेलेली ही कार विक्रीचे अपेक्षित आकडे गाठू शकली नाही. अखेर ६२४ सीसी ट्वीन पेट्रोल इंजिन, फोर स्पीड मॅन्युअल वा एएमटी गिअरबॉक्स अशी फीचर्स असलेली ही कार बंद केली गेली.

मिडिया रिपोर्ट नुसार स्थानिक वाहन उत्पादक इलेक्ट्रिक पॉवरट्रेन पुन्हा टाटा नॅनो बाजारात आणण्याच्या तयारीत असून यावेळी इलेक्ट्रिक अवतारात नॅनो अवतरणार आहे. अर्थात कंपनीने त्या संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. नव्या नॅनो इव्हीच्या अंडरपिनिंग सस्पेन्शन सेटअप व टायर मध्ये मोठा बदल केला जाणार आहे. ही कार अन्य कार्सच्या तुलनेत स्वस्त असेल त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाचे इलेक्ट्रिक कारचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल असा दावा केला जात आहे. टाटाच्या टिगोर, नेक्सोन या इलेक्ट्रिक गाड्यांना ग्राहकांची चांगली पंसंती मिळालेली आहे. टाटा नॅनो इव्ही कमी किमतीत जास्त रेंज देणारी कार असेल असेही सांगितले जात आहे.