फोर्ब्सच्या आशिया दानशूर यादीत तिघे भारतीय
फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या आशियातील सर्वाधिक दानशूर यादीत तीन भारतीय उद्योजक आहेत. आशियातील सध्या सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी, शिव नाडर आणि अशोक सुता अशी त्यांची नावे आहेत. या शिवाय मलेशियन भारतीय उद्योजक ब्राह्मल वासुदेवन आणि त्यांची वकील पत्नी शांती कांदिया यांचा सुद्धा या यादीत समावेश आहे.
अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी जून मध्ये त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ६० हजार कोटींचे दान जाहीर केले असून हा पैसा आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास या साठी वापरला जाणार आहे. एचसीएल समूहाचे प्रमुख शिव नाडर यांनी या वर्षात ११६०० कोटींचे दान दिले असून त्यातून शाळा आणि महाविद्यालये बांधली जात आहेत.
हॅपीएस्ट माइंडसचे कार्यकारी अध्यक्ष, ८० वर्षीय अशोक सुता यांनी चिकित्सा, संशोधन क्षेत्रासाठी २०२१ मध्ये ६०० कोटी दिले आहेत. त्यांची २०२१ मध्ये स्थापन केलेल्या ट्रस्टला हे दान देण्यात आले आहे.