मेस्सीचा १००० वा सामना ऑस्ट्रेलियावर विजयाने साजरा

आर्जेन्टिनाचा स्टार फुटबॉलर व फिफा वर्ल्ड कप २०२२ कप्तान लियोनेल मेस्सी याने त्याच्या व्यावसायिक करियर मधील १००० वा सामना ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून साजरा केला. कतार फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये प्री क़्वार्टर फेरीत आर्जेन्टिनाने ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवून उपउपांत्य फेरी गाठली. मेस्सीवर या सामन्यात खूप दबाब होता कारण त्याचा हा १००० वा सामना होताच पण तो संघाचा कप्तान सुद्धा आहे. त्याने आपल्यावरील जबाबदारी पार पडताना शानदार खेळाचे प्रदर्शन केले आणि चाहत्यांना निराश केले नाही. आता आर्जेन्टिनाचा पुढचा सामना नेदरलंड बरोबर होणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात मेस्सीने ३५ व्या मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी बढत मिळवून दिली. मेस्सीची एकूण गोलसंख्या ७७९ झाली असून फिफा २०२२ मधील त्याची गोल संख्या तीन वर गेली. त्यामुळे सर्वाधिक गोल करणाऱ्या इम्बापे, इनल वेलेन्सिया, कोडी ग्वाकपो, अल्वारो मोरारा, मार्क्स रशफोर्ड यांच्या यादीत मेस्सी एक नंबरवर आला आहे. त्याचा हा पाचवा विश्वकप आहे.

मेस्सीने प्रथमच नॉकआउट मुकाबल्यात गोल करण्यात यश मिळविले आहे. आर्जेन्टिनाची टीम आजपर्यंत वर्ल्ड कप मध्ये चार वेळा क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झाली आहे पण ते सेमी फायनल मध्ये कधीही हरलेले नाहीत. ही टीम तीन वेळा अंतिम फेरीत गेली आणि दोन वेळा चँपियन ठरली आहे.