हाडे गोठविणाऱ्या थंडीत जिवंत राहण्याचे कौशल्य बेअर ग्रील्स युक्रेनला शिकविणार

लोकप्रिय टीव्ही शो ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ चा निर्माता बेअर ग्रील्स याचे युक्रेनच्या राजधानीत राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या सोबतचे काही फोटो इन्स्टाग्राम वर शेअर केले गेले असून झेलेन्स्की ग्रील्सच्या सर्व्हायवल शो मध्ये दिसणार अशी चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान मोदी यापूर्वी या शो मध्ये सामील झालेले आहेत.

ब्रिटीश साहसवीर ग्रील्स याच्या युक्रेन भेटीबद्दल अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. दाट जंगलात विपरीत परिस्थितीत जिवंत राहण्याची कौशल्ये दाखविणारा त्याचा शो खूप लोकप्रिय झाला होता. युक्रेन पुढे सध्या हाडे गोठविणाऱ्या थंडीचे आव्हान उभे आहे. कारण रशियाने तेथील पॉवर ग्रीडवर सातत्याने मिसाईल्स डागून वीज पुरवठा बंद पाडला आहे. परिणामी लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे आपल्या विशेष कार्यक्रमातून ग्रील्स युक्रेनी नागरिक आणि राष्टपती झेलेन्स्की यांना वीज नसताना अति थंड वातावरणात कसे तगून राहायचे याचे कौशल्य शिकविणार असल्याचे अंदाज केले जात आहेत.

ग्रील्सने बर्फात जिवंत कसे राहायचे, गरम हवेसाठी बर्फाच्या गुहेत इनलेट असे बनवायचे या विषयी अनेक एपिसोड पूर्वी केले आहेत. ग्रील्सने त्याच्या इन्स्टाग्रामवर युक्रेन मध्ये राष्ट्रपती झेलेन्स्की यांची भेट आणि त्यांनी दाखविलेले आतिथ्य या बद्दल त्यांना धन्यवाद दिले आहेत.