हे आहे जगातील सर्वात महाग औषध, एक डोस २८ कोटींचा

जो पर्यंत आपली प्रकृती चांगली असते तोपर्यंत कुठले औषध किती महाग याची फारशी फिकीर आपण करत नाही. पण एखादा आजार असाही असू शकतो ज्यात उपचार किंवा औषध खरेदी करणे हे सर्वसामान्यच नव्हे तर अनेकदा श्रीमंत लोकांना सुद्धा शक्य होत नाही. जगात अशी काही औषधे आहेत ज्याच्या किमतीत अलिशान घरे, गाड्या येऊ शकतील. जगातील सर्वात महाग औषध म्हणून हेमजेनिक्स या औषधाची नोंद झाली असून या औषधाला अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅथोरिटीने मान्यता दिलेली आहे.

या औषधाचा एक डोस ३.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २८ कोटी रुपयांना असून हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. जेनेटिक डीसऑर्डर ट्रीट करण्यासाठी याचा वापर करावा लागतो. जेनेटिक डीसऑर्डरवर उपचार करणे डॉक्टर्स साठी सुद्धा अवघड  असते. हे औषध हिमोफेलीया, रक्त गुठळी डीसऑर्डरवर उपचार म्हणून वापरले जाते. या आजारात रक्ताची गुठळी बनण्यासाठी लागणाऱ्या प्रोटीनचे उत्पादन शरीरात होत नाही. त्यामुळे रुग्णाला जखम होऊन किंवा अन्य कारणांनी रक्तस्त्राव होऊ लागला तर तो थांबत नाही. अश्या वेळी सध्याचा उपचार म्हणजे या प्रोटीनची कमतरता दूर करणारे इंजेक्शन त्वरित द्यावे लागते आणि ते वारंवार द्यावे लागते.

हेमीजेनिक्सचा एक डोस हा या रोगावरचा कायमचा उपचार असून एकदाच हे इंजेक्शन द्यावे लागते. मात्र त्याची किंमत इतकी प्रचंड असल्याने सर्वसामान्यच काय पण श्रीमंत रुग्णांना सुद्धा हे औषध घेणे परवडत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही