जानेवारीत होणार केएल राहुल- अथिया शेट्टी विवाह

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि उपकप्तान केएल राहुल, टी २० वर्ल्ड कप २०२२ नंतर टीम इंडियातून काही काळासाठी बाहेर झाला आहे. न्यूझीलंड टी २० व वनडे मालिकेत त्याला आराम देण्यात आला होता. आता त्याच्या विवाहाच्या बातम्या येऊ लागल्या असून जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात तो चतुर्भुज होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे पुढच्या वर्षी होत आलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेत सुद्धा तो अनुपस्थित असेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

इनसाईड स्पोर्टच्या बातमीनुसार बांग्ला देश विरुद्ध टेस्ट सिरीज नंतर राहुलने बीसीसीआय कडे मिनी ब्रेक मागितला होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बॉलीवूड कलाकार सुनील शेट्टी यांची कन्या आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि के राहुल २०१८ पासून डेटिंग करत आहेत. क्रिकेट सिरीज दरम्यान अनेकदा या दोघांना एकत्र पाहिले गेले आहे. राहुल वर जर्मनी मध्ये शस्त्रक्रिया झाली तेव्हाही अथिया त्याच्या सोबत होती. आयपीएल दरम्यान दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते.

सुनील शेट्टीने योग्य वेळ येताच अथिया आणि राहुल विवाहबद्ध होतील असे यापूर्वी सांगितले होते. आता बहुतेक ती वेळ आली आहे. हा विवाह सुनीलच्या लोणावळा येथील फार्म हाउस वर होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.