फिफा वर्ल्ड कप, पहिली महिला रेफ्री फ्रेपार्ट रचणार इतिहास

फ्रांसची रेफ्री स्टेफनी फ्रेपार्ट कतार येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये गुरुवारी इतिहास रचणार आहे. जर्मनी आणि कोस्टा रिका यांच्यात होत असलेल्या सामन्यात फ्रेपार्ट रेफ्री म्हणून काम करणार असून पुरुष वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत काम करणारी फ्रेपार्ट पहिली महिला रेफ्री आहे. फ्रेपार्टच्या सहाय्याला अन्य दोन महिला रेफ्रींची निवड केली गेली आहे. ब्राझीलची नुएजा बँक व मेक्सिकोची करेन दियाज अशी त्यांची नावे आहेत. फिफाने निवडलेली चौथी महिला मॅच अधिकारी कॅथरीन नेसबीट सुद्धा अल बायन स्टेडीयम मध्ये व्हिडीओ समीक्षा टीमसह ऑफ साईड विशेषज्ञ म्हणून भूमिका बजावणार आहे.

फ्रांसच्या ३८ वर्षीय स्टेफनी फ्रेपार्टला युरोपीय फुटबॉल संस्था युएफए ने पदोन्नती देऊन पुरुष सामन्यात रेफ्री म्हणून निवडले आहे. स्टेफनीने विश्वकप क्वालिफाइंग व चँपियन लीग शिवाय या वर्षी फ्रेंच कप फायनल पुरुष सामन्यात म्हणूनही रेफ्री म्हणून काम केले आहे. फिफा २०१९ महिला विश्व कप फायनलची प्रभारी म्हणून सुद्धा तिने जबाबदारी पार पाडली आहे. फिफा २०२२ मध्ये रवांडाची सलीम मुकानसांगा आणि जपानची योशिमी योमाशिता या अन्य दोन महिला रेफ्रीची भूमिका बजावणार आहेत.