दोन रिव्हॉल्वर सोबत झोपतात एलोन मस्क- ट्वीट व्हायरल

ट्विटरची महिन्यापूर्वी खरेदी केलेले टेस्लाचे सीईओ एलोन मस्क दररोज काही ना काही ट्वीट करून चर्चेत आहेत. त्यांच्या मजेदार ट्वीट ना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे. मस्क यांनी सोमवारी केलेले एक ट्वीट सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाले असून त्याला ७० हजार लाईक्स मिळाले आहेत. ५ हजार युजर्सने ते रीट्वीट केले आहे आणि या ट्वीट वर प्रतिक्रियांचा पाउस पडला आहे.

मस्क यांनी या ट्वीट मध्ये त्यांच्या बेडरूम मधील एका टेबलाचा फोटो शेअर केला आहे. त्यात टेबलवर दोन रिव्होल्व्हर आणि डायट कोकचे चार कॅन, काही फोटो दिसत आहेत. आपण रोज दोन रिव्होल्व्हर सोबत घेऊन झोपतो असे मस्क यांचे म्हणणे आहे. यातील एक फिल्म प्रॉप प्रमाणे दिसते आहे तर दुसरे रिव्होल्व्हर १९ व्या शतकातले आहे. डाएट कोकच्या रिकाम्या कॅन वरून अनेकांनी मस्क यांना सल्ले दिले आहेत.

५१ वर्षीय मस्क यांनी ट्वीटरची धुरा हाती घेतल्यापासून त्यात अनेक बदल केले आहेत आणि निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. ब्लू टिक साठी ८ डॉलर्स आकारण्याची त्यांची योजना अयशस्वी ठरली पण त्यांनी ती पुन्हा लाँच केली आहे. अमेरिकेच्या गन कल्चर बाबत मस्क यांचे धोरण काय याचा नक्की अंदाज नसला तरी ज्यांना जीवाला खरोखर धोका आहे त्यांना शस्र हवेच असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे.