ऋतुराज गायकवाड ची पुन्हा तुफानी खेळी, मारले १८ चौकार आणि ६ षटकार


विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत रुतुराज गायकवाडने पुन्हा धमाका केला आणि आसामविरुद्धच्या सामन्यात 125 चेंडूत 168 धावा करून बाद झाला. गायकवाडने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकार मारले. उपांत्यपूर्व फेरीत गायकवाडने एका षटकात 7 षटकार मारले होते आणि 220 धावांची खेळी खेळली होती. आता उपांत्य फेरीतही ऋतुराजच्या बॅटने धुमाकूळ घातला आणि चौकार-षटकारांची बरसात करत त्याने गोलंदाजांचा समाचार घेतला . गायकवाड उपांत्य फेरीत द्विशतक झळकावण्यास हुकले असले तरी त्याच्या या खेळीने चाहत्यांची मनेही जिंकली. गायकवाडने १३३.३३ च्या स्ट्राईक रेटने धावा करत धमाका केला. गायकवाडनेही ८८ चेंडूत शतक पूर्ण केले.