लाइगर चित्रपटाच्या निधीवरून ED ने केली अभिनेता विजय देवरकोंडा याची चौकशी


हैदराबाद: ईडीने अभिनेता विजय देवरकोंडा याची बुधवारी त्याच्या ‘लाइगर’ चित्रपटाच्या निधीबाबत चौकशी केली. देवराकोंडा सकाळी आठच्या सुमारास ईडी कार्यालयात पोहोचले. लाइगर हा देवरकोंडाचा पहिला चित्रपट होता, ज्याचे बजेट सुमारे 100 कोटी असल्याचे सांगितले जाते. ईडीने केवळ देवरकोंडाच नाही तर चित्रपटाची निर्माती चार्मी कौन यांचीही या चित्रपटातील निधीबाबत चौकशी केली होती. ईडीने 17 नोव्हेंबर रोजी कौर यांची चौकशी केली होती. त्यादरम्यान परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवर त्यांची विशेष चौकशी करण्यात आली.

ईडीने चित्रपट जगताशी संबंधित कलाकारांची चौकशी करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी ईडीने जॅकलिन फर्नांडिसची मनी लाँड्रिंग प्रकरणात सात तास चौकशी केली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने म्हणजेच EOW ने २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली होती.