सोन्याची जीभ असलेल्या ममी सापडल्या

इजिप्त मधील क्वेस्त्रा कबरस्तानात पुरातत्व विभाग तज्ञांना सोन्याची जीभ असलेल्या ममी मिळाल्या आहेत. इजिप्त इनडीपेंडंटच्या रिपोर्ट नुसार येथील प्राचीन कबरस्तानात विविध कालखंडातील कबरी सापडतात. २०२१ मध्ये येथे २ हजार वर्षापूर्वीच्या ममीचा शोध लागला होता. या ममीच्या तोंडात सोन्याची जीभ होती. म्हणजे जिभेच्या आकाराचा सोन्याचा पत्रा होता.

मिळालेल्या माहितीनुसार शवाच्या तोंडात सोन्याची जीभ लागण्यामागे अशी कल्पना आहे कि जर ही व्यक्ती नंतरच्या आयुष्यात भगवान ओसिरीसच्या दरबारात केली तर ती बोलू शकेल. प्राचीन इजिप्त मध्ये अशी मान्यता आहे की  ओसिरीस ही पाताळ देवता असून मृतकांचा न्यायाधीश आहे.

या कबरस्तानात सापडलेल्या अन्य काही सांगाड्यामध्ये सोन्यासारखी चमकदार हाडे दिसून आली. अन्य काही ममी सोन्याच्या कमळ फुलांच्या सोबत होत्या. येथील ममी फारश्या चांगल्या स्थितीत नाहीत. २०२१ मध्ये सोन्याच्या जीभेच्या आकाराचे काही दागिने आणि एक खोपडी मिळाली होती. नंतर एक महिला, पुरुष आणि लहान मूल यांच्या ममी मध्ये सोन्याची जीभ होती.

येथे मृतदेह दफन करताना प्रत्येक कालखंडाप्रमाणे विविध रितीरिवाज पाळले जात असत. मृतदेह दिशा सुद्धा वेगवेगळ्या असत असे सांगितले जाते.