अॅपलने अॅप स्टोअरवरून ‘ट्विटर’ काढून टाकण्याची धमकी दिली, एलोन मस्कचा मोठा आरोप

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून रोज नवीन वाद चव्हाट्यावर येत आहेत. आता ऍपलने आपल्या अॅप स्टोअरमधून ‘ट्विटर’ काढून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप एलोन मस्कने केला आहे. मस्क म्हणाले की, अॅपल ट्विटरला ब्लॉक करण्यासाठी सर्व प्रकारे दबाव आणत आहे. आता ऍपलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात करणे हि बंद केले आहे.

मस्कने अॅपलचे सीईओ टिम कुक यांना टॅग करून प्रश्न विचारले
मस्क म्हणाले की Apple ने ट्विटरवर बहुतेक जाहिराती देणे बंद केले आहे. त्यांना अमेरिकेतील भाषण स्वातंत्र्याचा तिरस्कार आहे का? नंतर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या ट्विटर अकाऊंटला टॅग केले आणि विचारले की येथे काय चालले आहे? तथापि, ऍपलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही . ऍपल, जाहिरात मापन फर्म Pathmatics नुसार जगातील सर्वात मौल्यवान कंपनीअसून त्यांनी , 10 ते 16 नोव्हेंबर दरम्यान ट्विटर जाहिरातींवर अंदाजे US$131,600 खर्च केले, जे 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान कमी होऊन US$220,800 वर आले.