या देशात मुस्लीम आहेत पण मशिदीला नाही परवानगी

जगाच्या नकाशावर दोन असे देश आहेत जेथे मुस्लीम राहतात पण मशिदीला मात्र परवानगी नाही. हे दोन्ही देश नव्याने उदयास आलेले आहेत आणि तेथील मुस्लीम बरेच दिवस मशीद बांधण्याची परवानगी मागत आहेत मात्र सरकार परवानगी देण्यास तयार नाही. स्लोवाकिया आणि इस्तोनिया अशी या देशांची नावे आहेत. सोविएत युनियनचे विभाजन झाल्यावर या देशांनी स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे.

या दोन्ही देशात मुस्लिमांची संख्या खूप मोठी नाही. इस्तोनियामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार मुस्लिमांची संख्या १५०० होती त्यात आता वाढ झाली आहे. येथे बहुतेक मुस्लीम शिया आणि सुन्नी पंथाचे आहेत मात्र ते एकत्र नमाज पढतात. यातील बहुतेक पूर्वी रशियन सैन्यात होते. १९९१ मध्ये हा देश स्वतंत्र झाला असून तो युरोपियन युनियनचा सदस्य आहे. येथे नमाज घरातच अदा केली जाते. आनंदी देशांच्या यादीत या देशाचा समावेश आहे.

स्लोवाकिया येथे २०१० च्या मोजणीनुसार ५ हजार मुस्लीम आहेत. १७ व्या शतकात येथे तुर्की आणि उदगर मुस्लीम आले. युगोस्लावियाची फाळणी झाली तेव्हा त्यातून अनेक छोटे देश तयार झाले त्यात स्लोवाकिया, बोस्निया, अल्बानिया उदयास आले. येथे मुस्लीम शरणार्थी म्हणून आले होते. काही आशियातून आलेले आहेत. हा देश सुद्धा युरोपियन युनियनचा सदस्य आहे. येथे एकही मशीद नाही आणि त्यावरून बरेच वाद होतात. २०१५ मध्ये युरोपीय देशात शरणार्थी मुद्धा ऐरणीवर आला तेव्हा या देशाने २०० ख्रिस्चन लोकांना आश्रय दिला पण मुस्लिमांना नकार दिला. त्यांनी २०१६ मध्ये एक कायदा पास करून इस्लाम अधिकृत धर्म नाही असे नमूद केले आहे. येथे राजधानी बाहेर कोर्दोबा येथे एक छोट्याशी जागा असून तेथेच नमाज अदा केली जाते असे समजते.