युएईच्या व्हिसा साठी अर्ज करताय? मग नवीन नियमांची नोंद घ्या

संयुक्त अरब अमिराती मध्ये भारतीय मोठ्या प्रमाणावर जात असतात. या संदर्भात व्हिसा साठी युएईने नवे नियम लागू केले असून ते २१ नोव्हेंबर पासून लागू झाले आहेत. त्यानुसार पासपोर्टवर सिंगल नेम असेल तर व्हिसा रद्द होऊ शकतो. उदाहरणार्थ पासपोर्टवर फक्त नाव किंवा आडनाव असेल तर व्हिसा मिळणार नाही. त्या ऐवजी पासपोर्टवर नाव आणि आडनाव असणे व्हिसा साठी बंधनकारक केले गेले आहे. या संदर्भात सर्व ट्रॅव्हल एजंट कडे  नोटीस पाठविली गेली आहे. युएई मध्ये येणाऱ्या किंवा जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पासपोर्ट वर फर्स्ट आणि सरनेम दोन्ही लागणार आहे.

२०२२ च्या वर्षात दुबई मध्ये गेलेल्या विदेशी प्रवाशात सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे. विद्यार्थी, कर्मचारी भारतातून मोठ्या प्रमाणावर तिकडे जातात तसेच जोडपी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जातात. त्यामुळे लोकांनी त्यांच्या पार्टनरचे आडनाव पासपोर्टवर नसेल तर त्वरित दुरुस्ती करून घ्यावी असे सांगितले जात आहे. अर्थात पर्यटक, व्हिजीट व्हिसा साठी हे नियम लागू नाहीत. पण काम, नोकरी,शिक्षण किंवा निवास करण्यासाठी तिकडे जायचे असेल तर नवे नियम लागू आहेत. ज्यांच्याकडे पर्मनंट व्हिसा आहे त्यांना ही अट लागू नसली तरी त्यांनी व्हिसा अपडेट करून घायचा आहे असे कळविले गेले आहे.