रॉयल एन्फिल्डच्या इलेक्ट्रिक बाईकचे फोटो लिक

फोटो सौजन्य ऑटो कार

इलेक्ट्रिक वाहने ही आज काळाची गरज बनली आहेत. यामुळेच दुचाकी, तिचाकी आणि चार चाकी वाहन उत्पादन कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती कडे वळताना दिसत आहेत. दुचाकीच्या जगतात दीर्घ काळ लोकप्रिय राहिलेली रॉयल एन्फिल्ड सुद्धा त्याला अपवाद राहिलेली नाही. इलेक्ट्रिक बाईक सेग्मेंट मध्ये रॉयल एन्फिल्डची एन्ट्री म्हणूनच चर्चेचा विषय ठरली आहे.

रॉयल एन्फिल्ड ‘इलेक्ट्रिक ०१’ नावाने त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणणार असून त्याचे काही फोटो लिक झाले आहेत. ऑटो कारच्या सौजन्याने हे फोटो आले आहेत. दमदार बाईक्स म्हणून रॉयल एन्फिल्डच्या बाइक्स लोकप्रिय आहेत. इलेक्ट्रिक बाईकची काही फीचर्स सुद्धा या फोटो मधून समोर आली आहेत.

यात बाईकचे रेट्रोस्टाईल डिझाईन, फ्रंट सस्पेन्शन अॅट्रॅक्टीव्ह गर्डर फोर्क दिसत आहे. याचा वापर जास्त करून गाड्यांमध्ये होतो. याचा अर्थ या बाईक मध्ये मोठ्या प्रमाणावर रेट्रो स्टाईल पार्टस असतील. अॅलॉय व्हील्स,, एआय रोड रायडर टायर्स व वेगळ्या स्टाईलची चासी दिसते आहे. या बाईक २०२५ पर्यंत बाजारात येतील असे समजते. भारतासह अन्य देशात इव्ही प्रोटोटाईपचे टेस्टिंग सुरु झाले असल्याचे समजते.