विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त चुकीचे – वृषाली गोखले

मराठी आणि हिंदी चित्रपटातील नामवंत अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत चिंताजनक आहे. बुधवारी सायंकाळी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त पसरल्याने अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली पण विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त चुकीचे असून ते कोमा मध्ये आहेत असे त्यांच्या पत्नी वृषाली यांनी स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ५ नोव्हेंबर पासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने ते कोमा मध्ये गेले असून व्हेंटीलेटरवर आहेत. याच वेळी त्यांचे निधन झाल्याचे गोखले यांचे सहकलाकार आनंद महादेवन यांनी सांगितल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. बॉलीवूड मध्ये अजय देवगण सह अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र गोखले यांच्या पत्नी वृषाली आणि कन्या यांनी विक्रम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा खुलासा केला.

वृषाली गोखले म्हणाल्या, बुधवारी विक्रम कोमा मध्ये गेले असून प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटर वर ठेवले गेले आहे. त्यांना हृदय विकार आहे आणि किडनी विकार आहे त्यामुळे त्यांचे अनेक अवयव काम करेनासे झाले आहेत.गुरुवारी डॉक्टर्स पुढील निर्णय घेणार आहेत.