कार खरेदी करताय? मग जाणून घ्या सेदान ते इव्ही कार सेग्मेंटस

कार खरेदीच्या विचार करत असला तर काही महत्वाच्या बाबी जाणून घेणे आवश्यक असते. आपण कार खरेदी करताना बहुतेक वेळा जाहिराती, ओळखीच्या लोकांनी घेतलेल्या कार्स, त्यांच्या किंमती या बाबी पाहतो. पण आपल्याला कार घायची असेल तर सर्वप्रथम आपली गरज लक्षात घेतली पाहिजे. आज भारतात शेकडो कंपन्यांच्या विविध प्रकारच्या कार्स आहेत. अनेक सेग्मेंट मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स येतात. त्या कोणत्या याची माहिती करून घेणे फायद्याचे ठरते.

सेदान कार्सची मागणी वेगाने वाढते आहे. या आरामदायी कार्स लग्झरी कार्स म्हणून ओळखल्या जातात. लांबी रुंदीला त्या जास्त आहेत पण त्यांचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असतो. या कार्स प्रामुख्याने रोड ड्रायविंग साठी योग्य आहेत. होंडा सिटी, बीएमडब्ल्यू थ्री या प्रकारच्या कार्स आहेत.

आजकाल एसयुव्ही ला ग्राहकांची फार पसंती आहे. या कार्स सात ते आठ सीटर असतात आणि पॉवर, कंफर्ट बरोबरच हार्ड ऑफ रोड वर उत्तम अनुभव देतात. यांचा ग्राउंड क्लिअरन्स चांगला असतो, हेक्टर, सफारी, स्कोर्पियो या प्रकारात मोडतात. या कार्सना मोठी मागणी आहे.

हच बॅक कार्स भारतात सर्वाधिक खपणार्या कार्स आहेत. यांना फॅमिली कार म्हणून ओळखले जाते. यातील बहुतेक कार्स पाच सीटर असून गर्दीच्या वाहतुकीत सुद्धा आरामसे वाट मिळवू शकतात. स्विफ्ट, बलेनो, आय २० ही त्यांची काही उदाहरणे. या कार्सची डिकी अगदी छोटी असते किंवा नसते. त्यामुळे त्यांची लांबी कमी होते आणि गर्दीच्या ठिकाणी कार वळविताना किंवा गर्दीतून मार्ग काढताना फारशी अडचण येत नाही.

कन्व्हर्टीबल कार्स. या कार्सना भारतात फार मागणी नाही. यांच्या किमती जास्त आहेत आणि बहुतेक वेळा फॅशन स्टेटमेंट म्हणून या कार्स खरेदी केल्या जातात. या कार्सचे छप्पर काढून ओपन रुफ करता येते. बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज या प्रकारात येतात.

पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार्स बाजारात आणल्या आहेत. विविध देशांची सरकारे इलेक्ट्रिक वाहनाना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना अमलात आणत आहे. ग्राहकात या कार्स वेगाने लोकप्रिय होत असून अनेक बड्या कंपन्या त्यांच्या ईव्ही सादर करत आहेत. या कार्स सध्या थोड्या महाग आहेत. विशेष म्हणजे सेदान, एसयूव्ही, हचबॅक अश्या सर्व सेगमेंट मध्ये इलेक्ट्रिक कार्स येत आहेत.