आर्जेन्टिनाच्या या गावात मेस्सी नाव ठेवले तर होतो दंड

सध्या जगभरातील फुटबॉल चाहते कतार येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप मध्ये बुडून गेले आहेत. फिफा म्हटले कि सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव येते आर्जेन्टिना आणि लीयोनेल मेस्सी यांचे. आर्जेन्टिना मधील फुटबॉल स्टेडीयम वर नेहमी दिसणारी प्रचंड गर्दी आणि फिफा मध्ये दोन वेळा विजेतेपदाचा दावेदार मानली गेलेली मेस्सीची टीम यांची चर्चा नेहमीच होते. लियोनेल मेस्सीचे जगभरात लाखोनी चाहते आहेत. आर्जेन्टिना मध्ये सुद्धा मेस्सी लोकप्रिय आहेच. पण आर्जेन्टिना मधील एका गावात मुलाचे नाव मेस्सी ठेवण्यास सरकारने बंदी घातली असून ही बंदी मोडली तर दंड केला जातो याची अनेकांना माहिती नाही.

मेस्सीचे होमटाऊन रोसारियो येथे ही बंदी आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार या गावात मेस्सी या नावाची एकाच व्यक्ती आहे आणि तो आहे लीयोनेल मेस्सी. अन्य नागरिकांनी त्यांच्या मुलांना हेच नाव दिले तर मेस्सीच्या चाहत्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. हे टाळावे म्हणून मेस्सी नाव ठेवण्यास बंदी केली गेली आहे. आणि हा नियम पाळला नाही तर दंडाची तरतूद आहे.

आर्जेन्टिना अन्य अनेक कारणांनी सुद्धा प्रसिद्ध आहे. जगातील पहिली अॅनिमेटेड फिल्म येथेच बनली होती. ९० मिनिटाच्या या फिचर फिल्म मध्ये भ्रष्टाचाराची कथा सांगितली गेली होती. १९१७ मध्ये क्विरिनो क्रिस्टीयांनी यांनी ही फिल्म बनवली होती. मुळचे अमेरिकेतील लॅटीन नृत्य येथे प्रचंड लोकप्रिय असून टँगो नावाने ते पूर्ण देशभरात केले जाते. अतिशय रोमँटिक अश्या या नृत्यात कुणीही सहभागी होऊ शकते.

याच देशात हिमालय पर्वतानंतर दोन नंबर उंचीच्या अँडीज पर्वतरांगा आहेत आणि येथे ट्रेकिंगची मजा काही और येते. आर्जेन्टिना येथे डायनासोरच्या सर्वात जुन्या प्रजातीचे अवशेष मिळाले होते त्यामुळे संशोधक या ठिकाणी रिसर्च साठी मोठ्या प्रमाणावर येतात.