फिफा वर्ल्ड कप- सौदीने बलाढ्य आर्जेन्टिनाला पाजले पाणी

कतार येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. मंगळवारी पहिलाच सामना खेळणाऱ्या बलाढ्य आणि यंदाच्या स्पर्धेत विजयाचा दावेदर मानल्या जाणाऱ्या आर्जेन्टिनाला सौदी अरेबियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. सौदीने २-१ अश्या फरकाने आर्जेन्टिनाला पाणी पाजले. आर्जेन्टिनाच्या लियोनेल मेस्सीने १० व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली होती. आर्जेन्टिनाच्या लोटारॉ मार्टिनेजने दुसरा गोल केला पण रेफ्रीने हा गोल अमान्य केला होता.

दुसऱ्या हाफ मध्ये सौदीने वेगवान खेळ करून आर्जेन्टिनाला रोखून धरले आणि ४८ व्या मिनिटाला सालेह अलशेहरी याने पहिला गोल केला. ५३ व्या मिनिटाला सालेम अलडसारी याने दुसरा गोल करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. आर्जेन्टिनाला या सामन्यात कुठेच लय सापडली नाही. दुसर्या हाफ मध्ये आर्जेन्टिनाने कसून प्रयास केले पण सौदीच्या डिफेन्सने त्यांना कुठलीच संधी मिळू दिली नाही. या पराभवाबरोबर आर्जेन्टिनाची सलग ३६ विजयांची साखळी तुटली.

सौदी १९७४ अंतर आर्जेन्टिनाविरुध्द फिफा मध्ये पहिला सामना दोन गोल करून जिंकणारा पहिला संघ ठरला. १९७४ मध्ये शेवटच्या वेळी पोलंडने सौदीला ३- २ असे हरविले होते. फिफा वर्ल्ड कप इतिहासात  सौदीचा हा एकुणात तिसरा विजय असून त्यामुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आहे. सौदी सरकारने टीमच्या विजयानिमित्त बुधवारी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे, आर्जेन्टिनाचा पुढचा सामना २७ नोव्हेंबर रोजी मेक्सिको आणि ३० नोव्हेंबर रोजी पोलंड बरोबर आहे. उपउपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आर्जेन्टिनाला हे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.