युध्दग्रस्त युक्रेनमध्ये नाईटक्लबमध्ये होऊ लागली गर्दी

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये दैनंदिन जीवन, अनेक व्यवसाय ठप्प झाले असताना येथे एका ठिकाणी मात्र अलोट गर्दी लोटत असल्याचे दिसू लागले आहे. ही गर्दी नाईट क्लबमध्ये होत असून त्यामुळे अनेक ठिकाणी नव्याने नाईट क्लब सुरु होत आहेत. रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारी २०२२ ला पहिला हल्ला चढविला त्याला आता नऊ महिन्यांचा काळ लोटला आहे. पण अजून युध्द संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अश्या परिस्थितीत नागरिक युद्धाला कंटाळले आहेत आणि युद्धाच्या दहशतीतून बाहेर पडण्यासाठी मनोरंजनाकडे वळत आहेत.

या नाईट क्लब मध्येही स्ट्रीप टीज शो करण्रायाना क्लबकडे अधिक गर्दी होत असून क्लब चालक ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी आकर्षक जाहिराती, उत्तम प्रकारचे जेवण आणि हॉटेस्ट नर्तिका यांचे आकर्षण दाखवत असल्याचे दिसून येत आहे. राजधानी कीव मध्ये अश्या क्लबचा व्यवसाय जोरात सुरु आहे. बहुतेक क्लब दुपारपासून रात्री पर्यंत चालविले जात असून विकेंड साठी खास जाहिराती केल्या जात आहेत.

अर्थात या क्लब मध्ये फक्त अॅडल्ट प्रेक्षकांना प्रवेश दिला जात आहे. एका संध्याकाळ साठी एन्ट्री फी भारतीय रुपयात ७ ते १० हजार आहे. टेबलवर खासगी नृत्य अथवा टॉपलेस नृत्यासाठी अधिक पैसे भरावे लागत असल्याचे समजते. तरीही येथील गर्दी दिवसेनदिवस वाढते आहे.