या देशांत नाही भारतीयांचे अस्तित्व

जगाच्या कानाकोपर्यात कुठेही जा, भारतीय नाही अशी जागा नाही असे म्हटले जात असून सध्याच्या काळात भारतीय सर्वव्यापी बनल्याचे मानले जाते. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, मध्ये पूर्वेत मोठ्या संख्येने भारतीय आहेत. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक अश्या अनेक कारणांनी भारतीय परदेशात वास्तव्य करून आहेत. जगात १९५ देश असून त्यातील १९२ संयुक्त राष्ट्राचे सदस्य आहेत तर दोन गैर सदस्य आहेत. पण जगात तीन देश असे आहेत जेथे भारतीय नाहीत.

कॅथॉलिक क्रिश्चन लोकांचे अध्यात्मिक केंद्र असलेल्या व्हॅटीकन सिटी, या अवघ्या दोन मैलाचे क्षेत्र असलेल्या देशात एकही भारतीय नाही. रोम शहराने हा देश वेढला गेला आहे आणि या देशाची लोकसंख्या अवघी १ हजार आहे. या यादीतील दुसरा देश आहे सॅन मॅरिओ गणराज्य. इटली देशाने घेरलेला हा छोटा देश तेथील लोकसंख्या आहे साडेतीन लाख. येथे भारतीय पर्यटक दिसतात पण कायमचे वास्तव्य करणारे भारतीय मात्र नाहीत.

ऑस्ट्रेलियाच्या उत्तर पूर्व भागात प्रशांत महासागरात १० हजार वस्ती असलेल्या तुवालू बेटावर भारतीय नाहीत. या बेटावर ८ किमीचे रस्ते आहेत आणि येथे छोटी बेटे आहेत. काही काळापूर्वी येथे ब्रिटीश वसाहत होती. १९७८ मध्ये ही बेटे स्वतंत्र झाली. आपला शेजारी देश पाकिस्तान मध्ये अर्थातच भारतीय कैदी आणि राजकीय कैदी सोडून कुणी भारतीय नाहीत. बाल्कनच्या दक्षिण पूर्वेला असलेल्या बुल्गारीया मध्ये सुद्धा एकही भारतीय व्यक्ती नाही.