धोनीच्या ताफ्यात आली पहिली इलेक्ट्रिक कार

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याचा बाईक आणि कारचा शौक अनेकांना परिचयाचा आहे. धोनीच्या कार ताफ्यात आता पहिल्या इलेक्ट्रिक कारची एन्ट्री झाली आहे. त्याने सिंगल चार्ज मध्ये ७०० किमी रेंज देणारी किया ईवी ६ कार खरेदी केली आहे. सिल्व्हर रंगाची ही कार आहे. ही कार १८ मिनिटात ८० टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. ही कार चालविताना धोनीला नुकतेच पाहिले गेले आहे. त्याने काही दिवसांपूर्वी १९८० च्या दोन यामाहा बाईक सुद्धा खरेदी केल्या आहेत.

मिडिया रिपोर्ट नुसार किया ईव्ही ६ ची बाजारातील किंमत ५९.९५ लाख ते ६४.९५ लाख एक्स शो रूम आहे. या कार ला लग्झरी फीचर्स दिली गेली आहेत. इन्फोटेनमेंट बरोबरच ड्रायवर डिस्प्ले साठी कर्व्ड एचडी डिस्प्ले आहे. पुढच्या दोन सीट झिरो ग्रॅव्हीटी रिक्लाईन फंक्शनने युक्त असून चार्जिंग साठी अनेक पर्याय दिले गेले आहेत. सनरूप आहे. घरात कार चार्ज करता यावी म्हणून मागच्या सीट खाली पॉवर आउटलेट दिले गेले आहे.