लाखो रेशन कार्ड होणार रद्द- सरकारने घेतला निर्णय

सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांसाठी एक बातमी आहे. सरकारने लाखो रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. मोफत रेशन योजना सुरु झाल्यापासून असे लक्षात आले आहे कि १० लाखाहून अधिक कार्ड बनावट असून हे लोक अवैध पद्धतीने या योजनेचा लाभ घेत आहेत. अश्या बनावट कार्ड धारकांची यादी तयार झाली असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागाच्या नियमानुसार जे लोक आयकर भरतात, किंवा ज्यांच्याकडे १० बिघ्यापेक्षा अधिक जमीन आहे त्यांना मोफत रेशन कार्डचा लाभ मिळत नाही. मात्र या यादीत अशी अनेक नावे आहेत. अनेक कार्डधारक या मोफत रेशन योजनेचा लाभ घेऊन धान्य घेतात आणि त्याचा व्यापार करतात असेही समोर आले आहे. त्यामुळे या योजनेसाठी अपात्र ठरलेल्यांच्या याद्या तयार करून त्या रेशन वितरकांना दिल्या गेल्या आहेत. वितरकांनी अश्या बोगस कार्ड धारकांना रेशन देऊ नये असे स्पष्ट आदेश दिले गेले आहेत शिवाय अश्या कोणी व्यक्ती त्यांच्या यादीत असतील तर त्यांची माहिती जिल्हा मुख्यालयात देण्याचे आदेश दिले गेले आहेत. अश्या लोकांची कार्ड सुद्धा रद्द होणार आहेत.

सरकारच्या या मोफत रेशन योजनेचा फायदा सध्या ८० कोटी लोकांना होतो आहे मात्र बनावट कार्ड तयार करून या योजनेचा फायदा घेणाऱ्यांविरुद्ध सरकारने कडक पावले उचलली आहेत. त्यांची कार्ड रद्द होणार आहेतच पण घेतलेल्या धान्यापोटी वसुली सुद्धा केली जाणार आहे.