पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात,अनेक वाहनं एकमेकांवर आदळली

पुणे-बेंगळुरू महामार्गावर रविवारी मोठा अपघात झाला. या अपघातात सुमारे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, पुण्याजवळील नवले पुलावर ही घटना घडली आहे.

साताऱ्या कडून पुण्याला येणाऱ्या दिशेने हा ट्रक कात्रजच्या नवीन बोगद्यातून नवले पुलाच्या दिशेने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरील वाहनांना उडवत पुढे गेला. ट्रकचा ब्रेक नवले ब्रीजच्या उतारावर फेल झाला. त्यामुळे अनेक तब्बल २४ वाहनांच नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये २३ चार चाकी वाहन आणि एका रिक्षाच नुकसान झाल आहे.

या अपघातात ६ नागरिक किरकोळ जखमी झाले आहे.त्या सर्वावर दीनानाथ मंगेशकर आणि नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रस्त्यावर ऑईल सांडले असून ते साफ करण्याच काम सुरू आहे. काही वेळात वाहतुकी करिता रस्ता सुरू करण्यात येईल. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली