दोन डिस्प्ले, ९८०० एमएएच बॅटरी सह आला oukitel wp २१ स्मार्टफोन

बाजारात oukitel ने त्याचा नवा रग्ड स्मार्टफोन oukitel wp २१ लाँच केला आहे. ९८०० एमएएचच्या दमदार बॅटरी सह असलेल्या या फोनला हेलीओ जी ९९ चिपसेट दिला गेला आहे. कोणत्याही हवामानात वापरता येणारा हा फोन ११५० तासाचा स्टँडबाय टाईम देतो आणि त्याच्यावर १२ तास सलग व्हिडीओ प्ले करता येतात असा कंपनीचा दावा आहे.

या फोनसाठी ६.७८ इंची डिस्प्ले आहे. शिवाय मागील बाजूस आणखी एक डिस्प्ले दिला गेला आहे. हा डिस्प्ले एओडी ला सपोर्ट करतो. नोटिफिकेशन, म्युझिक कंट्रोल, व कॅमेरा व्यू फाईंडर रुपात हा काम करतो. घड्याळ म्हणून सुद्धा त्याचा वापर करता येतो. फोन साठी रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट असून प्रायमरी कॅमेरा ६४ एमपीचा आहे. २० एमपीचा नाईट व्हिजन सेन्सर आणि २ एमपी मॅक्रो लेन्स आहे. हा फोन डस्टप्रुफ, वॉटरप्रुफ सर्टिफिकेशन सह आहे.

१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असून मायक्रोएसडी कार्ड च्या सहाय्याने स्टोरेज वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. अँड्राईड १२ ओएस आहे. या फोनची किंमत २८० डॉलर्स म्हणजे २२८०० रु. आहे. २४ नोव्हेंबर पासून हा फोन अली एक्स्प्रेसवर विक्री साठी उपलब्ध होत आहे.