ऋतिक, सबा आझादसह १०० कोटींच्या घरात करणार वास्तव्य

बॉलीवूड मध्ये ‘ग्रीक गॉड’ म्हटला जाणारा आणि ‘सेक्सी पुरुष’ यादीत अनेकदा पहिल्या क्रमांकवर येणारा अभिनेता ऋतिक रोशन त्याची दीर्घकाळची मैत्रीण सबा आझाद सह लवकरच नव्या घरात राहायला जात आहे. जुहू वर्सोवा लिंक रोड वर असलेल्या या डुप्लेक्स घराची किंमत ९७. ५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. १५ आणि सोळावा मजल्यावर असलेल्या या घराचे नुतनीकरण सध्या सुरु असून घराचा एरिया ३८ हजार चौरस फुट असल्याचे सांगितले जात आहे. या घरातून अरबी समुद्राचे सुंदर दर्शन होते.

ऋतिक आणि सबा यांच्या मैत्रीचे रुपांतर गोड नात्यात होणार याचे संकेत मिळाले आहेत. दिवाळीच्या पार्टीला सबा रोशन कुटुंबात सामील झाली होती. ऋतिक प्रथम पत्नी सुझान पासून वेगळा झाल्यापासून सबा बरोवर आहे. आजकाल सार्वजनिक ठिकाणी सुद्धा हे दोघे एकत्र दिसतात. दीर्घकाळ त्यांचे डेटिंग सुरु आहे. २००० साली ऋतिकने सुझान बरोबर विवाह केला होता आणि २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आहे. त्यांना दोन मुले आहेत. सुझान सध्या अर्स्लान गोनी याला डेट करत असल्याचे समजते.

ऋतिकचा विक्रम वेधा नुकताच रिलीज झाला पण त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. सध्या तो फायटरचे शुटींग करत असून त्यात त्यांची नायिका आहे दीपिका पदुकोन.