येतोय सॅमसंग गॅलेक्सी सिरीज मधील सर्वात स्वस्त फाईव्ह जी फोन

कोरियन इलेक्ट्रोनिक्स कंपनी सॅमसंग त्यांच्या गॅलेक्सी सिरीज मधील नव्या ए सिरीज वर काम करत आहे. कंपनी लवकरच सॅमसंग गॅलेक्सी ए १४ फोर जी आणि ए १४ फाईव्ह जी फोन सादर करण्याच्या तयारीत असून ए १४ फाईव्ह जी हा कंपनीचा सर्वात स्वस्त फाईव्ह जी फोन असेल असे सांगितले जात आहे. ए १४ फाईव्ह जी ब्ल्यू टूथ एसआयजी डेटाबेसवर दिसला असून आता हे व्हेरीयंट गिक बेंच डेटाबेसवर रहस्यमय चिपसेट सह पाहिले गेले आहे. मॉडेल नंबर एसएम- ए १४ सिक्स बी नावाने ते पाहिले गेले आहे.

लिक झालेल्या फीचर्स नुसार या फोन साठी ६.५ इंची ओलेड डिस्प्ले वॉटर ड्रॉप नॉच सह असेल. अँड्राईड १३,नवीन ईएक्सवायएन ओएस चीपसेट दिला जाईल. या फोन साठी इन्फिनिटी यु डिस्प्लेची शक्यता वर्तवली जात आहे. ४ आणि ६ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, रिअर ला ट्रिपल कॅमेरा सेटअप, चार्जिंग आणि डेटा ट्रान्स्फर साठी  युएसबी टाईप सी पोर्ट, हेडफोन जॅक सह असेल.

हा फोन भारतात नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२२ मध्ये सादर होण्याची शक्यता असून त्याची किंमत साधारण २५ हजार रूपयांच्या दरम्यान असेल असेही सांगितले जात आहे.