या देशात आहेत सर्वात मजबूत इमारती

जगभरात स्काय स्क्रॅपर्स म्हणजे गगनचुंबी इमारती मोठ्या प्रमाणात बांधल्या गेल्या आहेत. मात्र इमारत जितकी उंच तितकी ती धोकादायक. विशेषत भूकंप आणि राक्षसी वादळे यात अश्या इमारतीनाचे अतोनात नुकसान होतेच पण अनेकदा मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होते. जगात जपान हा असा देश आहे जो छोट्या छोट्या बेटांवर वसला असून येथे जमीन कमी आहे. मात्र उद्योगधंद्यांची भरभराट येथे मोठ्या प्रमाणावर झाली आहे. परिणामी नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना शहरातून वास्तव्य करावे लागते. पण जमीन कमी असल्याने या शहरातून गगनचुंबी इमारती बांधल्या गेल्या आहेत.

विशेष म्हणजे जपान मध्ये बांधल्या जात असलेल्या या गगनचुंबी इमारती जगभरात सर्वात मजबूत मानल्या जातात. जपानला रोज भूकंपचे किमान दोन ते तीन धक्के बसतात मात्र तरीही या इमारतींचे नुकसान झाल्याचे किंवा मोठी मनुष्यहानी झाल्याचे आढळत नाही. येथील इमारती भूकंप रोधी म्हणजे ६ ते ८ रिश्टर स्केलच्या भूकंपाला सहज तोंड देऊ शकतील अश्या पद्धतीने बांधल्या गेल्या आहेत. या इमारती भूकंप झाले कि डोलतात किंवा एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे थोड्या सरकतात पण पडत नाहीत.

यासाठी येतील इंजीनिअर्स इमारती बांधताना त्यांच्या पिलर मध्येच शॉक अॅब्झोर्बर बसवितात. चालत्या कार मध्ये धक्के बसू नयेत म्हणून जे तंत्रज्ञान वापरले जाते त्याचाच हा एक प्रकार. शिवाय इमारतीच्या पायामध्ये मजबूत बॉल बेरिंग सुद्धा बसविले जातात. यामुळे इमारती हलल्या तरी पडत नाहीत. टोकियो, ओसावा, योकोहामा या अतिगर्दीच्या शहरात अश्या इमारती प्रामुख्याने बांधल्या जातात.

या इमारती तीन ते चार मोठे भूकंप सहज सहन करू शकतात. जपान मध्ये नागरिकांचे संरक्षण याला सर्वाधिक महत्व आहे यामुळे भूकंपात इमारतीत अडकलेले नागरिक सुरक्षित राहतील या दृष्टीने या इमारती बांधल्या जातात.