विवोने गुपचूप लाँच केला स्टायलिश स्मार्टफोन वाय ज़िरो १

चीनी स्मार्टफोन कंपनी विवो ने त्यांचा नवा स्टायलिश स्मार्टफोन वाय झिरो १ थायलंड मध्ये अजिबात गाजावाजा न करता लाँच केला आहे. या वर्षी विवोने याच फोनचे व्हेरीयंट मार्च मध्ये सादर केले होते. विशेष म्हणजे १० हजार रुपयांपेक्षा कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी हा फोन खास तयार केला गेला आहे.

या फोन साठी ६.५ इंची आयपीसी एलसीडी डिस्प्ले, बायोमेट्रिक सर्टिफिकेशन साठी फेस अनलॉक सुविधा दिली गेली आहे. मात्र फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेलेला नाही. फोनसाठी ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा तर बॅकवर चौकोनी कॅमेरा मोड्यूल आहे. ८ एमपीचा कॅमेरा, एलईडी फ्लॅश सह आहे. अँड्राईड ११ ओएस, मायक्रो युएसबी पोर्ट, १० डब्ल्यू चार्जिंग सपोर्ट सह असून फोनला ५ हजार एमएएच बॅटरी आहे. २ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज असून ते वाढविण्यासाठी कार्ड स्लॉट आहे.

हा फोन फोरजी ला सपोर्ट करेल आणि त्याला ड्युअल सिम आहे. थायलंड मध्ये या फोनची किंमत टीएचबी ३९९९ म्हणजे भारतीय रुपयात ९ हजार आहे. सफायर ब्लू आणि एलेगंट ब्लॅक रंगात हा फोन उपलब्ध आहे. लवकरच तो भारतासह जगातील अन्य बाजारात उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे.