गिनीज रेकॉर्डवाला हा लंबूटांग करतोय जगप्रवास

जगातील सर्वात उंच माणूस अशी नोंद गिनीज बुक मध्ये झालेला सुलतान कोसेन जगप्रवासात असून नुकतीच त्याने ब्रिटन, रोमानिया, अरिका येथे भेट दिली. त्यावेळी त्याच्या बरोबर सेल्फी घेण्यासाठी त्या त्या देशातील लोकांनी प्रचंड गर्दी केली. यामुळे सुलतानला आपण सेलेब्रिटी झालो असा फील आला आहे. सुलतानची उंची ८ फुट ३ इंच आहे. त्याच्या हाताची लांबी २७.५ सेंटीमिटर असून सर्वाधिक लांबीचे हात असलेला तो जगातील दोन नंबरचा माणूस आहे.

सुलतानचा जन्म १० डिसेंबर १९८२ मध्ये झाला आहे. तो पेशाने शेतकरी असून तुर्कस्थानचा आहे. तो सध्या ३९ वर्षाचा आहे. गेली १३ वर्षे जगातील सर्वात उंच माणूस म्हणून त्याचे गिनीज रेकॉर्ड कायम आहे. त्याच्या घरातील  सर्व नॉर्मल उंचीचे आहे. सुलतानला या अति उंचीचे अनेक त्रास आहेत. मापाचे कपडे, मापाचा बेड, बूट, घराचे दरवाजे अश्या अनेक रोजच्या गरजेच्या बाबी त्याला मिळत नाहीत. कार मध्ये बसणे त्याचसाठी त्रासदायक आहे. अर्थात सुलतानची अशी वाढ काही शारीरिक दोषांमुळे झाली असून त्याच्या मेंदूत पिटयुटरी ग्रंथीमध्ये गाठ आहे. त्यामुळे हार्मोनचा ओव्हर डोस तयार होतो. यामुळे त्याचे हात पाय अधिक लांब आहेत.

या विकारात शरीरातील हाडे वाढतात पण शरीर कमजोर होते. सुलतानने आत्तापर्यंत १२७ देश पालथे घातले आहेत. करोना काळात त्याला घरात अडकून पडावे लागले होते. पण आता तो उरलेले देश पाहण्यासाठी प्रवास करत आहे.