अॅपल आयफोन १५ अल्ट्रासाठी नवी पाच फीचर्स, पण किंमत?

अॅपलच्या अपकमिंग आयफोन १५ ची चर्चा आता सुरु झाली असून यावेळी आयफोन १५ अल्ट्रा विशेष चर्चेत आहे. या फोन साठी पाच नवी फीचर्स दिली जातील असे सांगितले जात आहे. अॅपल प्रथमच या फोन मध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा देण्याची शक्यता आहे. शिवाय युएसबी सी टाईप चार्जिंग केबल सह हा फोन येईल त्यामुळे वेगळ्या चार्जिंग केबलची गरज राहणार नाही. अल्ट्रासाठी प्रथमच टायटॅनियम बॉडी दिली जाईल. अल्ट्रा प्रीमियम साठी हे फिचर असेल आणि त्यामुळे फोन अन्य मॉडेलच्या तुलनेत हलका पण अधिक मजबूत असेल. सध्याच्या आयफोन साठी स्टील बॉडी दिली जात आहेत. टायटॅनियम मुळे कमी स्क्रॅचेस येतील.

आयफोन १५ च्या सर्व मॉडेल्सना सॅटेलाईट कनेक्टीव्हिटी, ड्युअल ई सिम कार्ड, स्क्रॅच प्रोटेक्शन फिचर दिले जाणार आहे. आयफोन १५ ची चार मॉडेल्स आयफोन १५, आयफोन १५ प्रो, आयफोन प्लस आणि आयफोन १५ अल्ट्रा अशी त्यांची नावे असून अल्ट्रा हे सिरीज मधले नवे मॉडेल आहे. टायटॅनियम बॉडी सह येणाऱ्या फोनची किंमत २ लाख पर्यंत असेल असे समजते. अर्थात आयफोन १४ प्रो मॅक्सची १ टीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १,८९,९०० रुपये होतीच.

या फोन साठी ६.७३ इंची डिस्प्ले, ८ जीबी रॅम, ,१२८ जीबी स्टोरेज, रिअलला ट्रिपल कॅमेरा सेट असेल. प्रायमरी कॅमेरा ४८ एमपी आणि अन्य दोन सेन्सर प्रत्येकी १२ एमपीचे तर फ्रंटला १२ एमपीचा कॅमेरा दिला जाईल. हे फोन फाईव्ह जी फोन आहेत.