येशू ख्रिस्ताचे ट्विटर अकौंट व्हेरीफाईड झाले, मिळाली ब्ल्यू टिक

एलोन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यावर पेमेंट ब्ल्यू स्टिक योजना बनविली असून खाते व्हेरीफाईड होण्याचा आता जणू पूर आला आहे. कुणीतरी येशू ख्रिस्त नावाचे अकौंट व्हेरीफाय करण्यासाठी पैसे भरून ब्लू टिक मिळविली असल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्विटर खरेदी पूर्वी मस्क यांनी या साईट वर बनावट खाती खूप मोठ्या प्रमाणावर असल्याची तक्रार केली होती. ट्विटर खरेदी करताना या प्रकारात सुधारणा करण्याची घोषणा त्यांनी केली होती. पण आता उलटाच प्रकार घडला असून बनावट खात्यांची संख्या वाढत चालल्याचे समोर येत आहे.

अनेक प्रमुख ब्रांड, प्रसिध्द व्यक्ती यांच्या फेक अकौंटची संख्या ट्विटरवर वाढली आहे. मस्क यांनी कोणतेही अकौंट व्हेरीफाय बदल करण्यासाठी ब्ल्यू टिक योजना आणली आणि काही देशात ही योजना सुरु झाली आहे. त्याचा पहिला परिणाम येशूच्या नावाचे बनावट अकौट ब्लू टिकवाले झाले असून या अकौंटचे ७ लाख ८० हजार फॉलोअर आहेत. हे अकौंट २००६ पासून ट्विटरवर आहे. यात येशूचे निवासस्थान इस्रायल असल्याचे नमूद केले गेले आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरने प्रतिबंध घातला होता मात्र ट्रम्प यांचेही बनावट खाते ब्ल्यू टिक वाले बनले आहे. रोमिंग कॅरेक्टर सुपर मारियो पासून प्लेअर लेब्रोन जेम्स यांची बनावट खाती व्हेरीफाय झाली आहेत. ट्विटरवर व्हेरीफाईड सिस्टीम २००९ पासून कार्यरत आहे. हाय प्रोफाईल आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत खरी खाती ओळखता यावे यासाठी ही सिस्टीम आहे. मात्र त्यासाठी यापूर्वी शुल्क आकारले जात नव्हते. सध्या ट्विटरवर ४,२३,००० व्हेरीफाईड खाती असून त्यात प्रसिद्ध व्यक्ती, राजकीय नेते, उद्योजक, स्वतंत्र पत्रकार यांचा समावेश आहे.