बिग बझार साठी अदानी, अंबानी आमनेसामने

जगातील धनकुबेर यादीत समावेश असलेले अदानी ग्रुपचे गौतम अदानी आणि रिलायंस समूहाचे मुकेश अंबानी देशात नव्या स्पर्धेत आमनेसामने आले आहेत. हे दोन्ही दिग्गज उद्योजक कर्जबाजारी झालेल्या फ्युचर रिटेल लिमिटेड या कंपनीच्या अधिग्रहणासाठी मैदानात उतरले आहेत. मिडिया रिपोर्ट नुसार एप्रिल मून रिटेल प्रायव्हेट लिमी, अदानी एअरपोर्ट होल्डिंग व फ्लेमिंगो ग्रुप यांचे संयुक्त व्हेन्चर, रिलायंस रिटेल व्हेन्चर सह अन्य १३ फर्मनी फ्युचर रिटेल साठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल केला आहे.

फ्युचर रिटेलसाठी एओआय जमा करण्याची मुदत नोव्हेंबरच्या सुरवातीला संपली आहे. फ्युचर देशातील दोन नंबरची मोठी रिटेलर फर्म ‘बिग बझार स्टोर्स’ साठी देशभरात ओळखला जातो. मात्र सध्या हि कंपनी कर्जबाजारी झाली आहे. त्यांना कर्जदारांचे २१ हजार कोटी फेडायचे आहे. कार्पोरेट दिवाळखोरी प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना ३३ अर्थसंस्थांचे कर्ज सुद्धा फेडायचे आहे.