म्हणून दरवर्षी जानेवारीत मोठ्या संखेने विकल्या जातात कार्स

एक गोष्ट बारकाईने तपासली तर असे लक्षात येते कि दरवर्षी सणासुदीच्या दिवसांपेक्षाही जास्त कार्स जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात विकल्या जातात. हा ट्रेंड दरवर्षीच दिसतो आणि त्यामागे काही कारणे सुद्धा आहेत. या काळात अनेक कार उत्पादक कंपन्या डिस्काऊंट जाहीर करतातच पण डीलर्स सुद्धा अनेक बक्षिसे, सर्विस स्कीम्स जाहीर करत असतात.

या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या वर्षी उत्पादन झालेल्या कार्सचा स्लॉट त्यांना संपवायचा असतो. कारण अलीकडच्या वर्षात उत्पादन झालेल्या गाड्या तांत्रिक दृष्टया जुन्या ठरतात परिणामी डीलर्स या कार्सच्या खरेदीवर चांगल्या ऑफर्स देतात. दुसरे कारण म्हणजे ग्राहक या काळात वाहन खरेदीस प्राधान्य देतात कारण मार्च पूर्वी खरेदी केल्यास कर सवलत मिळते. शिवाय उत्पादन जुने असले तरी नवीन वर्षात खरेदी केल्याने त्यांची नोंदणी नवीन वर्षात होते.

यंदा म्हणजे २०२२ मध्ये तर या वर्षात तयार झालेल्या गाड्या २०२३ जानेवारी फेब्रुवारी मध्ये मोठ्या संखेने सेल केल्या जातील असे सांगितले जात आहे. बीएस ६ फेज दोन या वर्षात आणले जात आहे आणि १ एप्रिल पासून ते लागू होणार आहे. त्यानंतर बीएस ६ च्या सर्व गाड्या विक्री बंद होणार आहे. याचे अनेक फायदे ग्राहकांना होणार आहेत. प्रत्यक्ष एक्स शो रूम पेक्षा कमी किंमतीत गाड्या मिळणार आहेत. सर्व्हिस, अॅक्सेसरीजवर अनेक आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. आणि महत्वाचे म्हणजे कार जेव्हा खरेदी केली तेव्हाच नोंदणी केली जाणार असल्याने पेपरवर तरी कार नवीनच राहणार आहे.

अर्थात या खरेदी मध्ये एकच तोटा आहे तो म्हणजे, रोजच काही नवी टेक्नोलॉजी या क्षेत्रात येते आहे त्यामुळे आपण खरेदी केलेल्या वाहनात काही फीचर्स कमी मिळू शकतात.