प्रथमच अमेझोनचे बाजारमूल्य १ लाख कोटींनी घसरले

जगातील सर्वाधिक धनाढ्य व्यक्ती जेफ बेजोस यांच्या एक नंबरच्या ई कॉमर्स कंपनी अमेझोनचे बाजारमूल्य १ लाख कोटींनी( एक ट्रिलीयन) ने घसरले आहे. यामुळे अमेझोनने नवे, खराब रेकॉर्ड नोंदविले असून इतक्या प्रचंड रकमेने बाजारमूल्य गमावणारी सार्वजनिक क्षेत्रातली ही पहिली लिस्टेड कंपनी बनली आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार चलनवाढ, मंदीची चाहूल, बँकांनी वाढविलेले व्याजदर आणि करोना काळानंतर छोटी दुकाने, बाजार पुन्हा सुरु झाल्याने ग्राहकांची कमी झालेली ऑनलाईन खरेदी यामुळे कंपनीचा महसूल कमी झाला असून त्यातच गुंतवणूक दारांनी मोठ्या संख्येने शेअर विक्री केल्याने कंपनीचे शेअर घसरले. बुधवारी ई कॉमर्स व क्लाऊड सेवा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये ४.३ टक्के घट नोंदविली गेली. परिणामी अमेझोनचे बाजारमूल्य २०२१ च्या तुलनेत घसरून १.८८ लाख कोटींवरून ८७९ अब्ज डॉलर्सवर आले.

अमेझोनच नाही तर मायक्रोसोफ्टचे बाजारमूल्य सुद्धा नोव्हेंबर २०२१च्या तुलनेत घसरून ८८९ अब्ज डॉलर्स नुकसान झाले आहे. प्रमुख पाच अमेरीकेन टेक कंपन्यांचा महसूल घसरल्याने त्यांचे बाजारमूल्य ४ लाख कोटी डॉलर्सनी कमी झाले आहे. अमेझोनने आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी मोठी गुंतवणूक केली मात्र तुलनेने विक्री मंदावली, खर्च वाढला आणि जाहिरातींचे उत्पन्न घटल्याने कंपनी शेअर ५० टक्के घसरले असे समजते. कंपनीचे सहसंस्थापक जेफ बेजोस यांची संपत्ती सुद्धा ८३ अब्ज डॉलर्स ने कमी होऊन १०८ अब्ज डॉलर्सवर आली आहे.

यामुळे कंपनीने नवीन कर्मचारी भरती थांबविली आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या इतिहासात या तिमाहीत सर्वात कमी महसूल मिळाला त्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य १ लाख कोटी डॉलर्स कमी झाले असे सांगितले जात आहे.