शमीचा मूर्खपणा पाहून चिडले रोहित आणि हार्दिक,आयसीसी हि म्हणाली- ‘काय होतं ते..

वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारताचा (भारतीय क्रिकेट संघ) 10 गडी राखून पराभव झाला. सेमीफायनलमध्ये भारताची गोलंदाजी तर खराब होतीच पण क्षेत्ररक्षणही तितकेच खराब होते. वास्तविक, एकीकडे भारतीय गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांना लगाम लावू शकले नाहीत, तर दुसरीकडे क्षेत्ररक्षण हि खूप साधारण होते . याचे उदाहरण तेव्हा पाहायला मिळाले जेव्हा इंग्लंडच्या डावाच्या 9व्या षटकात मोहम्मद शमीने चेंडू पकडला आणि असे काही केले की ज्याचा कोणी विचारही केला नसेल. असे झाले की 9व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने हार्दिक पांड्याविरुद्ध रिव्हर्स स्वीप शॉट मारला, जो फाइन लेग बाऊंड्रीकडे गेला, जिथे मोहम्मद शमी चेंडू पकडण्यासाठी धावत होता. शमीशिवाय भुवीही चेंडूच्या मागे धावत होता.

अशा स्थितीत शमीने चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकण्याऐवजी चेंडूचा पाठलाग करणाऱ्या भुवीकडे चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र भुवी त्याच्या खूप जवळ आल्याचे शमीला कळले नाही. अशात शमीने फेकलेला चेंडू भुवीच्या डोक्यावरून गेला. त्यानंतर भुवीने पळत चेंडू पकडला, तोपर्यंत इंग्लंडचे सलामीवीर पळून गेले आणि 4 धावा काढल्या. ही चूक पाहून हार्दिक शांतपणे शमीकडे पाहत होता, तर रोहित शर्मा हाताने इशारा करत शमीच्या चुकीवर भडकला होता. सामन्यादरम्यान हे दृश्य ज्या कोणी पाहिलं, त्यांनी नक्कीच डोकं धरलं असेल. त्याचवेळी आयसीसीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे काय होते..’