येतोय स्वदेशी कंपनी लावाचा फाईव्ह जी बजेट स्मार्टफोन

स्वदेशी स्मार्टफोन उत्पादक कंपनी लावाने बुधवारी केलेल्या घोषणेनुसार त्यांचा लेटेस्ट ब्लेझ हा फाईव्ह जी स्मार्टफोन १५ नोव्हेंबर रोजी विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. हा फोन ई कॉमर्स कंपनी अमेझोनवर खरेदी करता येणार आहे. फोनची किंमत १०९९९ रुपये असून सुरवातीला स्टॉक संपेपर्यंत हा फोन ९९९९ रुपयात ग्राहक खरेदी करू शकणार आहेत.

लावा ब्लेझ फाईव्ह जी, निळा आणि हिरवा अश्या दोन रंगात येईल. ग्लास बॅक डिझाईनच्या या फोनला ६.५ इंची एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला गेला आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असून मायक्रो एस डी कार्ड च्या मदतीने स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढविता येणार आहे. तसेच फोन साठी ७ जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट दिला गेला आहे. अँड्राईड १२ ओएस आणि ५ हजार एमएएचची बॅटरी दिली गेली आहे.

फोन साठी रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट असून प्रायमरी कॅमेरा ५० एमपीचा आहे. सेल्फीसाठी ८ एमपी कॅमेरा आहे. फोन बॅकराउंड मध्ये युट्यूब चालविता येईल असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे युजर्स मल्टीटास्किंग करू शकणार आहेत. ड्युअल सिम सपोर्ट दिला गेला असून फेस अनलॉक फिचर आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.