येतोय रियलमी चा देखणा ५ जी फोन १० प्रो प्लस

चीनी स्मारफोन कंपनी रिअलमी लवकरच त्यांची सिरीज १० सादर करत असून त्यातील रिअलमी १० व रिअलमी १० प्रो प्लस मॉडेल्स चीनी वेबसाईटवर दिसली आहेत. हा फोन तीन कलर ऑप्शन मध्ये येईल त्यात ब्लॅक आणि निळा रंग सामील आहे. दोन स्टोरेज पर्याय दिले गेले आहेत. बेस मॉडेल साठी ८ जीबी रॅम ,१२८ जीबी स्टोरेज तर हायएंड मॉडेल साठी १२ जीबी रॅम,२५६ जीबी स्टोरेज असेल.

हा फोन फाईव्ह जी ला सपोर्ट करणार आहे. फोनला ६.७८ इंची फुल एचडी स्क्रीन, फ्लॅट फ्रेम डिझाईन आहे. उजव्या कडेवर पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे आणि सिम स्लॉट उजव्या बाजूला आहे. वॉटर ड्रॉप नॉच मध्ये १६ एमपी सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. तर रिअरला १०८ एमपीचा प्रायमरी कॅमेरा, ८ एमपी आणि २ एमपीचे अन्य दोन सेन्सर्स आहेत. एलईडी फ्लॅश आहे. कॉर्निंग गोरील्ला ग्लास ५ प्रोटेक्शन आहे.

फोनसाठी ५ हजार एमएएच बॅटरी, अँड्राईड १३ ओएस, हेडफोन जॅक दिले असून हा फोन १७ नोव्हेंबर रोजी प्रथम चीन मध्ये लाँच होणार आहे. त्यानंतर तो भारतात येईल. भारतात हा फोन साधारण २५ हजार रुपये दरम्यान मिळणार आहे.