एलोन मस्क आठवड्यात १२० तास करताहेत काम

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क ट्विटर खरेदीपासून पाच कंपन्यांचा कारभार पाहत आहेत. टेस्ला, नुएरा लिंक, स्पेस एक्स, कॉस्मेटिक ब्रांड द बोरिंग आणि आता ट्विटर अश्या या पाच कंपन्या आहेत. त्यामुळे मस्क यांच्यावरच्या कामाचा ताण प्रचंड वाढला असून सध्या ते आठवड्याला ७० ते ८० ऐवजी चक्क १२० तास काम करत आहेत. मस्क सांगतात, मी सकाळी उठतो, काम करतो, झोपतो , उठतो, काम करतो’ असे माझे सध्याचे रुटीन आहे.

मस्क यांचे आठवड्याचे साती दिवस १९ ते २० तास रोज कामात जात आहेत. सध्या त्यांनी सर्व वेळ ट्विटर साठी दिला असून ट्विटरचा जम एकदा बसला कि मग ते स्पेस एक्स, टेस्ला कडे पाहणार आहेत. ट्विटर खरेदी नंतर त्यांनी ट्विटर मधील ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरी पाठविले असून त्यात माजी सीईओ पराग अग्रवाल यांचाही समावेश आहे. ट्विटर वापरण्याच्या पद्धतीतच मस्क अमुलाग्र बदल करणार आहेत. ब्लू टिक साठी पैसे आकारण्याचा निर्णय त्यांनी यापूर्वीच जाहीर केला असून आता डायरेक्ट मेसेज वर सुद्धा शुल्क लागू करण्याचा त्यांचा विचार आहे असे सांगितले जात आहे.

आयओएस युजर्स  साठी निवडक देशात ट्विटर व्हेरीफीकेशन सबस्क्रीप्शन रोलआउट केले गेले असून त्यात युएस, युके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड यांचा समावेश आहे. भारतात ब्लू टिक सबस्क्रीप्शन एक महिन्यात सुरु होईल असे समजते. त्यासाठी महिना ८ डॉलर्स चार्ज केले जाणार असल्याची चर्चा आहे.