सानिया मिर्झा, शोएब मलिक घटस्फोटाच्या उंबरठ्यावर?

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा पाकिस्तानी क्रिकेटपटू पती शोएब मलिक यांच्यातील नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरु आहे. हे दोघे घटस्फोट घेणार असल्याचे संकेत मिळत असून सानियाच्या नव्या इन्स्टा पोस्ट मुळे त्याला अधिक पुष्टी मिळाली आहे. यामुळे सानियाचे चाहते चिंतेत पडले आहेत.

सानियाने तिच्या नव्या इन्स्टा पोस्ट मध्ये’ हृदय भंगलेले अल्लाचा शोध घेण्यासाठी कुठे जात असतील?’ असा प्रश्न केला आहे. पाकिस्तानी मिडिया नुसार शोएबने एका टीव्ही शो मध्ये सानियाला धोका दिला आहे. त्यामुळे त्यांच्यात मतभेद सुरु असून गेले अनेक दिवस ते वेगळे राहत आहेत. पण मुलगा इजहान यांच्यासाठी ते काही वेळा एकत्र येतात. एप्रिल २०१० मध्ये सानिया आणि शोएब यांचा निकाह झाला असून त्यांना इजहान हा चार वर्षाचा मुलगा आहे.

या दोघांनी इजहानचा वाढदिवस नुकताच दुबई येथे साजरा केला. त्याचे फोटो मलिकने शेअर केले आहेत. पण सानियाने काही दिवसांपूर्वी इजहानसह जे फोटो शेअर केले त्याखाली दिलेल्या कॅप्शन मध्ये ‘ ते क्षण मला सर्वात कठीण दिवसांची आठवण करून देतात’ असे म्हटले आहे.