बॉलीवूड कलाकार सोडा, हे दिग्दर्शक आकारतात इतकी फी

बॉलीवूड, टॉलीवूड मधील तारे तारका आणि प्रत्येक चित्रपटासाठी ते आकारात असलेले मानधन याची चर्चा नेहमीच होत असते. पण अनेकाना याची कल्पना नाही की या तारे तारकांपेक्षा अधिक मानधन घेणारे अनेक चित्रपट दिग्दर्शक सिनेसृष्टीत आहेत. त्यांचा प्रत्येक चित्रपट मानधनाचा आकडा ५० कोटी पासून १०० कोटींपर्यंत आहे.

यात आघाडीवर आहेत बाहुबली, अगाधीश, बाहुबली दोन आणि आरआरआर सारखे हिट चित्रपट देणारे एसएस राजमौली. ते एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये घेतात. त्यापाठोपाठ नंबर आहे मुन्नाभाई, थ्री इडियटस फेम राजकुमार हिरानी यांचा. ते एका चित्रपटासाठी ८० कोटी रुपये मानधन घेतात. दक्षिणेकडील चित्रपट दिग्दर्शनात प्रशांत नील यांचेही मोठे नाव आहे. तेही एका चित्रपटासाठी ८० कोटी रुपये घेतात. केजीएफ १ आणि २चे दिग्दर्शन त्यांनी केले होते.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुकुमार हे या यादीत चार नंबरवर आहेत. ते प्रत्येक चित्रपटासाठी ७५ कोटी रुपये घेतात. पुष्पा द राईज, आर्या, रंगस्थलम असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. बॉलीवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी या यादीत पाच नंबरवर आहेत. ते एका चित्रपटासाठी ५५ कोटी घेतात. बाजीराव मस्तानी, हम दिल दे चुके सनम, गंगुबाई काठियावाडी असे अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी दिले आहेत. शाहरुखच्या ‘जवान’चे दिग्दर्शक एटली एका चित्रपटासाठी ५० कोटी घेतात तर रोहित शेट्टी एका चित्रपटाचे ४५ कोटी घेतात. सूर्यवंशी, चेन्नई एक्स्प्रेस असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत.

बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय दिग्दर्शक करन जोहर एका चित्रपटाचे ४० कोटी घेतो. कुछ कूछ होता है, स्टुडंट ऑफ द एअर, कल हो ना हो, कभी ख़ुशी कभी गम असे एकापेक्षा एक हिट चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत.