आशा चित्तींणीचा झाला गर्भपात?

नामिबिया मधून कुनो अभयारण्यात आणल्या गेलेल्या आठ चित्त्यातील मादा चित्ता आशा हिचा गर्भपात झाल्याचे वृत्त आहे. आशा हे नाव पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. नामिबियातून येतानाच आशा मध्ये गरोदरपणाची लक्षणे होती. चित्त्याच्या गरोदरपणाचा काळ ९३ दिवसांचा असतो. मात्र आता १०० दिवस उलटून गेल्याने आशाचा गर्भपात झाला असावा असे मानले जात आहे. डॉक्टर लोरी म्हणाल्या चित्त्याचा सुरवातीच्या दिवसात गर्भपात होणे नित्याचे आहे. आशाचा तणावा मुळे गर्भपात झाला असावा.

कुनो अभयारण्यात सोड्ण्यात आलेल्या आठ पैकी दोन सख्खी भावंडे असलेले चित्ते मोठ्या कुंपणात सोडले गेले असून त्यांना शिकार करता यावी म्हणून हरणे आणि सांबर सोडले गेले आहेत. शनिवारी या चित्त्यांनी शिकारीचा प्रयत्न केला मात्र त्यांना शिकार करता आली नाही. हे चित्ते कुनो जंगलात रुळले असल्याचे हे लक्षण मानले जात आहे. आणखी काही दिवसांनी बाकीचे चित्ते सुद्धा जंगलात सोडले जाणार आहेत.