६० पेक्षा अधिक सुटे भाग जोडून तयार होतात स्मार्टफोन

आजकाल स्मार्टफोन जीवनावश्यक वस्तू बनली आहे. केवळ कॉलिंग साठीच नाही तर प्रोफेशनल कामासाठी सुद्धा स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. हे छोटेसे उपकरण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत माणसाचे जीवन व्यापून राहिले आहे. अनेक कामे चुटकी सरशी करणारे हे उपकरण तयार कसे होते याची मात्र अनेकांना माहिती नाही.

आज बाजारात अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांची विविध मॉडेल्स घेऊन ग्राहकांच्या साठी सज्ज आहेत. प्रत्येक स्मार्टफोनची वेगळी खासियत आहे. स्मार्टफोन कारखान्यात तयार होतानाच्या सुरवातीच्या प्रोसिजर बऱ्याचश्या सारख्या असतात. एक स्मार्टफोन तयार करण्यासाठी ६० पेक्षा अधिक सुटे भाग जोडावे लागतात. पाच इंचाचे हे उपकरण असले तरी ते कार्यान्वित होण्यासाठी अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. सुटे भाग जोडणी पूर्ण झाल्यावर मग त्यात कॉल, मेसेज, चॅटींग, व्हिडीओ कॉल यांचे काम केले जाते. हे काम पूर्ण झाले कि टेस्टिंग सुरु होते.

टेस्टिंग मध्ये एक स्मार्टफोन प्रथम २०० वेळा पाडण्यात येतो. मग पुढची प्रोसेस सुरु होते. एका मोबाईलची टच सेन्सिटीव्हीटी चेक करण्यासाठी किमान १० हजार वेळा टच टेस्ट केली जाते. त्यापूर्वी अत्यंत छोटे भाग उत्पादन प्रयोगशाळेत बारकाईने तपासले जात असतात. त्यानंतर येते गुणवत्ता. युजरची कोणतीही तक्रार येऊ नये यासाठी हजारो टेस्ट घेतल्या जातात आणि त्यानंतर फोन बाजारात येण्यासाठी तयार होतो. मग चार्जर, ईअरफोन सारख्या अॅक्सेसरीज बॉक्स मध्ये घालून फोन पॅक होतो आणि बाजारात येतो. अनेक फोन वर १ वर्षाची वॉरंटी कंपन्या देतात.