चीनी कामगारांना पाकिस्तानात इम्रानखान पेक्षा जास्त सुरक्षा मिळणार

पाकिस्तान मध्ये कामासाठी आलेल्या चीनी कामगारांवर हल्ले होण्याच्या घटना मध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन या कामगारांना कामावरून बाहेर पडताना बुलेट प्रुफ वाहने पुरविली जाणार आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यापेक्षा चीनी कामगारांना अधिक सुरक्षा पुरविली जाणार असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

रविवारी आलेल्या बातमीनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज नवाझ बीजिंग येथे चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटले तेव्हा चीनी कामगारांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत जीन्ग्पिंग यांनी चिंता व्यक्त केली होती. चीन आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या सिपेक प्रकल्पासाठी अनेक चीनी कामगार पाकिस्तान मध्ये काम करत आहेत. अरबी सागरातील पाकिस्तानी बंदर खादर आणि चीनच्या उत्तर पश्चिम शिन्जीयांग भागाला जोडण्याचे काम सुरु आहे. या साठी ६० अब्ज डॉलर्स खर्च केले जात आहेत. शी जिनपिंग यांच्या साठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे. पण चीनी कामगारांवर पाकिस्तानात होणारे हल्ले हा चिंतेचा विषय बनला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बीजिंग यात्रेवरून परतल्यावर चीनी कामगारांना सुरक्षा संबंधित उपकरणे पुरविणे आणि चीनी नागरिकांसंबंधी गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय फोरेन्सिक विज्ञान एजन्सीकडे देण्यासंदर्भात काही निर्णय घेतल्याचे समजते. हा फोरेन्सिक विभाग आधुनिक केला जाणार असून त्यात चीन सहकार्य करणार आहे.