इस्रायलच्या लेडी सोल्जर्स, सुंदर तितक्याच खतरनाक

इस्रायलची सेना जगात सर्वात शूर मानली जाते आणि अनेकदा इस्रायली सेनेने त्यांचे श्रेष्ठत्व सिध्द करून दाखविले आहे. विशेष म्हणजे इस्रायलच्या लेडी सोल्जर्स याही पराक्रमात मागे नाहीत. विशेष म्हणजे या महिला सैनिक जश्या युद्धभूमी गाजवतात तशाच सोशल मिडीयावर सुद्धा गाजत असतात. सौदर्य आणि बहादुरी हातात हात घालून कशी नांदते याचे इस्रायली लेडी सोल्जर्स हे उत्तम उदाहरण आहे.

इस्रायल हा आधुनिक देश आहे पण येथेही प्रत्यक्ष रणभूमीवर मर्दुमकी गाजवायला मिळण्याची संधी मिळावी म्हणून महिलांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. आता मात्र इस्रायली सेनेत महीला सैनिकांची संख्या वाढविली जात असून आर्टिलरी, एअर डिफेन्स, स्थानिक मोर्चे आणि युद्धभूमीवर अनेक ठिकाणी महिला सैनिक आपले शौर्य दाखवीत आहेत. १९४८ मध्ये इस्रायलने स्वातंत्राची घोषणा केली तेव्हापासून सेनेत महिला सामील आहेत पण युद्धभूमीवर त्यांना पाठविले जात नसे. येथे लष्करी सेवा सर्वाना बंधनकारक आहे. त्यामुळे महिलांना सुद्धा लष्करी सेवा करावी लागते. मात्र फक्त ज्यू महिलांनाच ही संधी मिळते.

२०२१ मध्ये इस्रायल डिफेन्स कोर्सेस मध्ये महिलांचा हिस्सा ४० टक्के होता.२०१८ मध्ये १० हजार महिलांना पर्मनंट कमिशन दिले गेले. १९६२ ते २०१६ या काळात ५३५ महिला सैनिक देशासाठी शहीद झाल्या आहेत. सध्या ४ टक्के महिला युद्ध भूमीवर तैनात असून त्यात पायदळ, हेलीकॉप्टर, फायटर पायलट अशी त्यांची पदे आहेत.