ट्विटरने भारतात सुरु केली कपात मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभाग पूर्णपणे काढून टाकला- सूत्र

ट्विटरने शुक्रवारी भारतात मोठ्या प्रमाणावर कपात जाहीर केली आहे . कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्यामुळे अभियंत्यांसह कंपनातील इतर सर्व विभागांवर परिणाम झाला आहे. एनडीटीव्हीने दिल्येल्या माहितूनुसार ट्विटरने भारतातील मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभाग पूर्णपणे काढून टाकला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवीन मालक, एलोन मस्क यांनी ट्विटरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्याचे $44 अब्ज संपादन व्यवहार्य करण्यासाठी जगभरातील कर्मचारी कमी केले आहेत.

जागतिक स्तरावर कंपनीचे कर्मचारी कमी करण्याच्या योजनेचा भाग म्हणून Twitter ने भारतातील कर्मचार्‍यांना कमी करण्यास सुरुवात केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांनी गेल्या आठवड्यात ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पराग अग्रवाल तसेच मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) आणि इतर काही उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले. त्याने ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर लगेचच हे केले. यानंतर कंपनीच्या उच्च व्यवस्थापनातील अनेकांनी राजीनामे दिले.