समन्स का पाठवता आहत , थेट अटक करून दाखवा: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे ED ला आव्हान

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज ईडीने हजर राहायला सांगितले होते, मात्र ते हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीला समन्स पाठवू नका, थेट अटक करून दाखवा, असे सांगितले. मला तुरुंगात टाकून घाबरवतील, असे भाजपला वाटते. या कटाला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. जनता सोबत असेल तर कोणतीही लढाई लढण्यास तयार आहे. भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, आज सीबीआय आणि ईडीचा वापर शस्त्रासारखा केला जात आहे. भाजप आमच्या सरकारचेही बिघडवू शकत नाहीत आणि आम्ही पाच वर्षे पूर्ण करु . या भाषणानंतर हेमंत छत्तीसगडला जाणार आहेत.

सीएम सोरेन यांना गुरुवारी सकाळी 11.30 वाजता रांची येथील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले. ईडीने पोलिस महासंचालकांना पत्र लिहून सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्याची विनंती केली होती. यानंतर आता हेमंत सोरेन भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते आमच्या सरकारचे केसही खराब करू शकत नाहीत, आम्ही पाच वर्षे पूर्ण करू, असे त्यांनी आज स्पष्टपणे सांगितले आहे.