फ्लिपकार्ट आकारणार अधिक शुल्क

ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर संदर्भात मोठी घोषणा केली आहे. कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हँडलिंग शुल्क द्यावे लागणार आहे. ५०० रुपये पेक्षा अधिक खरेदीवर ५ रुपये तर ५०० रुपये पेक्षा कमी खरेदीवर ग्राहकाला ४० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी विशेष प्राईज रेंज वस्तू खरेदीवर शिपिंग चार्ज आकारला जात असे. मात्र हँडलिंग कॉस्ट वाढल्याने सर्व खरेदीवर असे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे.

अर्थात जे ग्राहक ऑनलाईन पेमेंट करणार आहेत त्यांना हे शुल्क भरावे लागणार नाही. तसेच  एक्स सबस्क्रायबर ना हे शुल्क भरावे लागणार नाही. कॅश ऑन डिलिव्हरीचे प्रमाण कमी व्हावे आणि ऑनलाईन पेमेंटला प्रोत्साहन मिळावे असा यामागचा हेतू आहे असे समजते. फ्लिपकार्टवर आता पूर्वी फक्त शो रूम मधून विकत घेता येणाऱ्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. ग्रीव इलेक्ट्रिक मोबिलिटीचे युनिट अँपायर ईव्हीने त्यांच्या मॅग्नस एक्स इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात ऑनलाईन विक्री करण्यासाठी फ्लिपकार्ट बरोबर सहकार्य करार केला आहे.

हँडलिंग शुल्क भरण्यापासून सुटका हवी असेल तर ग्राहकांनी ऑर्डर प्री पेड म्हणजे अगोदरच ऑनलाईन पेमेंट करून वस्तू बुक करावी असेही कंपनीने सुचविले आहे.