मराठी चित्रपटात अक्षयकुमार साकारणार छत्रपती शिवरायांची भूमिका

मुंबई: आगामी वर्षात प्रसिद्ध होणाऱ्या “वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटात विख्यात अभिनेता अक्षयकुमार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि वासिम कुरेशी निर्मित या चित्रपटाचे प्रदर्शन मराठीसह हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्येही केले जाणार आहे. सन २०२३ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे मला माझ्या मोठ्या स्वप्नाची पूर्तता झाल्यासारखे आहे. ही जितकी अभिमानाची बाब आहे, तितकीच जबाबदारीची आहे. या भूमिकेसाठी आपण आपली अभिनयक्षमता पूर्ण पणाला लावू, अशा शब्दात अक्षयकुमारने आपल्या भावना व्यक्त केल्या.

आपल्याला अक्षयकुमार बरोबर काम करण्याची इच्छा होती. या चित्रपटाच्या निमित्ताने ती पूर्ण होत आहे. या. चित्रपटात शिवरायांची भूमिका स्वीकारण्यासाठी आम्हाला अक्षयकुमार यांच्यासारखा तगड्या व्यक्तिमत्त्वाचा आणि उत्तम जाण असलेला अभिनेता हवा होता., असे मांजरेकर यांनी सांगितले.